भोंगवली गावचे होतकरू विद्यार्थी व तरुणांचा सत्कार


दि. 28 सारोळे :-भोंगवली गावातील होतकरू तरुणांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या कार्याने गावाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल आजी-माजी सरपंच, उपसरपंच, प्रहार संघटनेचे अध्यक्ष तसेच सन्माननीय ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

 

या कार्यक्रमात पै. पृथ्वीराज भोसले (महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक विजेता), कु. कुणाल निगडे (भारतीय नौदलात निवड), साईराज संतोष भोसले कुस्तीमध्ये भोर तालुक्यामध्ये प्रथम आला जिल्हास्तरीय खेळणार आहे,तसेच कु. वरद महादेव शेडगे (इ. ८ वी प्रवेशासाठी निवड) या गावातील कर्तृत्ववान तरुणांचा विशेष सन्मान करण्यात आला.

ADVERTISEMENT

 

गुरुवार दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ७ वाजता मारुती मंदिर,भोंगवली येथे पार पडलेल्या या सोहळ्यात मान्यवर ग्रामस्थांची उपस्थिती लाभली. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या होतकरू मुलांचे मनोबल वाढवले.

 

कार्यक्रमाचे आयोजन आजी-माजी सरपंच, उपसरपंच, प्रहार अध्यक्ष व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

 

या उपक्रमामुळे तरुणाईला प्रेरणा मिळून गावातील विद्यार्थ्यांना पुढे जाण्याचा नक्कीच आत्मविश्वास मिळणार आहे, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!