किकवी येथील १०८ रुग्णवाहिका सेवेमुळे आई व बाळाचे प्राण वाचले!
शिरवळ :- पानसरे वस्ती, शिरवळ (खंडाळा) येथून दि 27 ऑगस्ट रोजी प्रसूतीसंदर्भात आपत्कालीन कॉल प्राप्त झाला. शिरवळ १०८ एम्बुलन्स उपलब्ध नसल्यामुळे किकवी येथील १०८ एम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
या वेळी पायलट दामोदर अहिरे व वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार माळी यांनी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने सातव्या महिन्यातील गरोदर महिलेची सुरक्षित प्रसूती केली. बाळाचे वजन १.८ किलो असून तो मुलगा आहे. प्रसूतीनंतर आई व बाळास शिरवळ येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले व तेथून वैद्यकीय अधिकारी डॉ. किती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी सातारा येथे सुरक्षित पोहोचविण्यात आले.
नातेवाईकांनी वेळेत दिलेल्या मदतीबद्दल व सेवेसाठी १०८ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार माळी, पायलट दामोदर अहिरे, पुणे १०८ डीएम डॉ. प्रियांक जावळे व एडीएम सुजित पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.
“योग्य वेळी दिलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेमुळे आई व बाळाचे प्राण वाचले,” असे नातेवाईकांनी सांगितले.


