लोणंद मधील धोकादायक चेंबर देत आहेत ट्रॅफिक जाम व अपघातास निमंत्रण सेल्फी विथ समस्या आंदोलनातून फुटतेय वाचा….
संपादक दिलीप वाघमारे
पुणे – सातारा महामार्ग व लोणंद – खंडाळा रस्त्याच्या धावपट्टीला घासुनच सांडपाणी वाहून जाणारे गटारी व पिण्याच्या पाण्याचे वॉल यांवर लोणंद नगरपंचायतीने लोखंडी व सिमेंट चे चेंबर उभारले आहेत सदर चेंबर गाड्यांचे टायर जाऊन ओझ्याखाली दबुन चेंबलेले आणि तुटत चालले आहे तर काही ठिकाणी नामशेष झाले आहेत. सदर परिस्थिती ट्राफिक जाम करणे अथवा अपघातास निमंत्रण देत आहे एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे व अपघातुन बळी किंवा कायमचे अपंगत्व येवू शकते. यास जबाबदार कोण..? नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणा यांचे लक्ष वेधण्यासाठी व समस्या निवारण होणे कामी या चेंबर चे फोटो सेल्फी विथ समस्या या आंदोलनातुन शेअर झाल्याने याबाबत चांगलीच वाचा फुटली आहे.
शहरातील मुख्य चौकांत तसेच रस्त्याला लागून असलेल्या चेंबर ला काही ठिकाणी पोलीस बॅरेकेटने झाकुन सुरक्षा दिली जात आहे तर काही ठिकाणी दगड विट ढिगारे लावण्यात आले आहेत तसेच एका ठिकाणी तर चक्क लोखंडी पाळणाच या चेंबरवर बसविला आहे या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना सुरू करणे आवश्यक आहे, एखादा बळी गेला तरच प्रशासकीय यंत्रणा जागे होणार आहेत का…? अशा प्रश्न वाहनधारक व नागरिक उपस्थित करत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते कय्युम मुल्ला यांनी सेल्फी विथ समस्या या आंदोलनातुन नागरिकांना एक आनोखे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहे. बदलत्या काळानुसार नव्या युगातील नवे आंदोलनाची दिशा दिली आहे यामुळे नागरिकांच्यात या सेल्फी विथ समस्या आंदोलन लोकप्रिय ठरत असुन चौकाचौकात याची चर्चा सुरू आहे व आनोखे आंदोलनास भरभरुन प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे या आंदोलनाची दखल प्रशासकीय यंत्रणा घेतील का…? असा सवाल काही जण व्यक्त करत असताना काहींनी या सेल्फी विथ समस्यांचे फोटो चे जाहिर प्रदर्शन नगरपंचायत पठांगनावर आयोजित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तर काही नागरिकांनी समस्या निवारण झाल्या नाहीत तर त्या ठिकाणी संबंधित अधिकारी यांचे फोटो लावून सन्मान करण्यात आला पाहिजे अशा खुमखुमीत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते कय्युम मुल्ला यांच्या आंदोलनाचे कौतुक होत नागरिक देखील निर्भीडपणे समस्यांसोबत सेल्फी काढून सोशल मिडियावर व्हायरल करत असल्याचे चित्र दिसत आहे.


