अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा आयोजित सातारा तालुका आढावा बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्याचे आदेश -जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटील
सातारा – बजरंग चौधरी
अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सातारा तालुक्यातील कार्यकारणी पदाधिकारी यांच्या कार्याचा आढावा बैठकीचे आयोजन आणि पुढचे पाऊल पुस्तकांचे वितरण करण्यात आले होते या वेळी काही महत्त्वाचे निर्णय घेत जे पदाधिकारी मराठा महासंघांच्या नावाचा दूर उपयोग करून पदासठी आणि नावसाठी आपल्या स्वतः च्या प्रतिप्ठोचा विचार करत असतील तर अशा पदाधिकारी यांच्या पदाचा विचार करून त्या पदावर नविन पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात येणार आहेत आणि काही तालुक्यात केलेल्या आहेत सातारा तालुक्यात ही नवीन पदाधिकारी यांच्या निवडी बाबत निर्णय घेण्यात आलेला आहे या अनुसंघाने बाकी इतर तालुक्यात ही पदांन मध्ये फेर बदल नवीन पदाधिकारी यांच्या नव्याने पद नियुक्त्या होणार आहेत जे पदाधिकारी कार्यरत नाहीत किंवा आजपर्यंत संघटनेच्या कोणत्याही मिटिंगमध्ये किंवा कार्यक्रमात सहभागी झालेले नाहीत आशी पदे रद्द करून नव्याने पद नियुक्ती करण्यात येणार आहेत अशाप्रकारे सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे तसा संबंधित पदाधिकारी यांना आदेश आणि सुचना सातारा जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी या वेळी करण्यात आलेल्या आहेत या बैठकीचे आयोजन शिवशाही हाँटेल वाढे फाटा सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या वेळी सातारा तालुका शिवसेना माजी अध्यक्ष हैबतराव नलावडे( बापू) यांची मराठा महासंघाच्या सातारा जिल्हा उपध्यक्ष पदी निवड करण्यात आली या वेळी सातारा जिल्ह्यातील आणि तालुक्यातील पदाधिकारी मेठ्या संखेने हजार होते बाळासाहेब साळवी सातारा जिल्हा कार्याध्यक्ष, राहूल शिंदे सातारा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सावंत सातारा जिल्हा युवक कार्याध्यक्ष , बजरंग चौधरी सातारा जिल्हा उपाध्यक्ष, अनिकेत पाटणे खंडाळा तालुका पश्चिम अध्यक्ष संदीप माने सातारा जिल्हा प्रिंट मिडिया अध्यक्ष , वांगडे बजीरंग जावली तालुका कार्याध्यक्ष, प्रविण सावंत वाई शहर युवा अध्यक्ष, शुभम शिंदे वाई तालुका कार्याध्यक्ष चेतन भोसले वाई तालुका उपाध्यक्ष, शेखर जाधव सोशल प्रिंट मिडिया विभाग अध्यक्ष, अनिल करंदकर सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष, हैबतराव नलावडे (बापू) संदीप जाधव वाई आणि जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


