कराड- कराड तालुक्यात काँग्रेसला धक्का माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सत्ता असलेली मलकापुर नगरपालिकेतील ४.नगरसेवक भाजपात प्रवेश.
सातारा कराड : धर्मेद्र वर्पे.
मुंबई येथे अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वात मलकापूर नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण माजी सभापती गितांजली पाटील,माजी नगरसेविका स्वाती तुपे,अनिता यादव,शहाजी पाटील,समीर तुपे, विजय चव्हाण, मल्लाप्पा बामणे,राजूभय्या मुल्ला यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.तसेच कराड दक्षिण येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल कचरे,लातूर येथील सामाजिक कार्यकर्त्या माया मते,नवी मुंबई येथील सुनिता हिवराळे आणि सतविंदर कौर यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी या कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.सर्वांचे भारतीय जनता पार्टीत सहर्ष स्वागत व पक्ष कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. यावेळी माझ्यासमवेत भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखाताई माने – कदम,
प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे,माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्यासह इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.