पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी भोर तालुक्यातील न्हावी३२२ या गावातील सरपंच पद रिक्त केले! विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांची कारवाई.


 

सारोळे : भोर तालुक्यातील पूर्व भागातील सारोळे वीर महामार्ग लगत न्हावी ३२२ मध्ये ग्रामपंचायत सरपंच गणेश ज्ञानोबा सोनवणे यांनी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर काम केल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्या न्यायालयात दि. २०/६/२४ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार कामात अनियमिता केल्यामुळे व पदाचा दुरुपयोग केल्यामुळे सरपंच व सदस्य पद रिक्त करून सर्वात मोठी कारवाई केली.यासाठी कापूरहोळ येथील राजवाडा हॉटेलमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आणि बळीराजा संघटना च्या वतीने गुरुवार दि. २७/६/२४ रोजी पत्रकार परिषद पार पडली.

 

प्रहार जनशक्ती संघटनेचे उपाध्यक्ष अजय रूपचंद कांबळे न्हावी ३२२ यांनी सांगितले की,न्हावी गावचे २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये निवडून येऊन बहुमताने गणेश सोनवणे यांना सरपंच मिळाले. सरपंच पद मिळाल्यानंतर त्यांनी बेकायदेशीर कामे केली, १५ वित्त आयोगाचा निधी हा ग्रामसभाची मंजुरीघेता परस्पर खर्च केला, मनमानी कारभार करत ग्रामपंचायत रजिस्टर मधील खाडाखोड करून८उतारा,मृत्यू दाखले तयार केले. तसेच ग्रामपंचायत कामांमध्ये भ्रष्टाचार केला. जेव्हापासून पदभार स्वीकारला तेआता सोडेपर्यंत योजनानिधीची सखोल,चौकशी करून त्यांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करावा नाहीतर येणाऱ्या काळात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येईल तसेच आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय दिला तसाच पुढे भोर तालुक्यातील गोरगरीब जनतेला प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करणार तसेच समाजकार्य चालू ठेवणार,

ADVERTISEMENT

असे प्रहार जनशक्ती पक्ष उपाध्यक्ष अजय रूपचंद्र कांबळे यांनी समाज माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

पुढे भोर प्रहार जनशक्ती पक्ष मा.तालुका अध्यक्ष संतोष मोहिते यांनी सांगितले की, पुरावे देऊन पण पुणे येथील अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळला. अर्ज फेटाळल्यामुळे चार महिने संघर्ष करावा लागला. यासाठी भोर तालुक्याला सक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. चांगला अधिकारी असल्याने त्याखालील सर्व टीम गोरगरीब जनतेची कामे करतात. टीम सक्षम असेल तर गोरगरीब जनतेला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाण्याची वेळ येणार नाही.

 

यावेळी संतोष मोहिते मा.अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष भोर, रमेश गणगे बळीराजा शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष, मिलिंद तारू, जगन्नाथ सपकाळ, लवाजी मालुसरे आधी पदाधिकारी उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!