भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांचा चाळीस गाव खोऱ्यात गाव भेट दौरा.


 

पुण्यभूमी न्यूज नेटवर्क

दि. 4 भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यातील चाळीस गाव खोऱ्यातील चिखलावडे, नाटंबी, करंजे, पानव्हळ, नाझरे, कर्णावड, रावडी, चिखलगाव, टिटेघर, कोर्ले, वडतुंबी, म्हाकोशी, आंबवडे, घोरपडेवाडी, सांगवी भिडे, कारी, भावेखल, आपटी, नांदगाव, वाठार हि.मा. पिसावरे या गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले आंबेघर -आंबवडे हा या खोऱ्यातील महत्वाचा रस्ता असून सर्व गावे याच रस्त्याने जोडली आहेत त्याचबरोबर श्रीक्षेत्र आंबवडे, किल्ले रायरेश्वर याठिकाणी अनेक पर्यटक व शिवप्रेमी येत असतात या सर्वांचा विचार करून या मुख्य रस्त्याचे काम साडे पाच मिटर रुंदीकरणास मजबुतीकारण करण्यात आले पुढे आंबवडे ते कोर्ले याही रस्त्याचे काम मार्गी लावता आले. आंबवडे कर्णावड रावडी चिखलगाव टिटेघर याही रिंग रोडचे काम मार्गी लावता आले, मुख्य रस्ता रायरेश्वर किल्ला शिडीपर्यतचा रस्ता मंदिर परिसर सुशोभिकारण, रायरी मार्गे लोखंडी शिडी बसविणे यासाठी निधी उपलब्ध करता आला असल्याचे सांगितले.

ADVERTISEMENT

विशेष करून आपण सर्व शेतकरी असून शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी लोकनेते आदरणीय थोपटे साहेबांनी पाहीलेल्या दूरदृषितून धोम बलकवडी डावा कालवा, कोर्ले (व्याहळी ) बंधारा, कोर्ले वडतुंबी टिटेघर उपसा जलसिंचन योजना, वेनवडी जलसिंचन योजनेद्वारे आंबेघर, चिखलावडे, पानव्हळ, नाझरे पर्यंतच्या भागात या योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी उपलब्ध होत आहे असल्याने याभातील शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असल्याचे शेतकरी वर्गाला मोठा दिलास मिळेल, पूर्वीच्याकाळी म्हाकोशी बांधाऱ्यासाठीही अनेकांनी विरोध केला पण साहेबांनी तो प्रश्न मार्गी लावल्याने या भागाचा कायापालट झाल्याचे आपण सर्वजण पाहतोय.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, स्थानिक आमदार निधी, डोंगरी विकास कार्यक्रम, २५१५, ३०५४, ५०५४, जिल्हा नियोजन समिती या माध्यमातून चिखलावडे, अंगसुळे, कारी या गावांना जोडणारे मुख्यरस्ते, गावागावातील वाडीवस्तीमध्ये नळपाणी पुरवठा योजना, सभामंडप, अंतर्गत रस्ते काँक्रिटिकारण, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा इमारत, गटारे, स्मशानभूमी, समाजमंदिर, अनेक लहान मोठे रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मानसिंग बाबा धुमाळ, रविंद्र बांदल, माऊली शिंदे, हनुमंत कंक, शैलेश सोनवणे, बाळासाहेब थोपटे, नितीन दामगुडे, आनंदा आंबवले, अनील सावले, सतिश चव्हाण, रामदास जेधे, सुभाष कोंढाळकर, बाळासाहेब घोलप, सुधीर खोपडे, बाळासाहेब शिंदे, अंकुश चौधरी, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मित्र यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!