सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
खेडशिवापूर प्रतिनिधी : राजगड पोलीस स्टेशन च्या अंतर्गत येणाऱ्या खेडशिवापूर दूरक्षेत्राच्या ऑफिसमध्ये रविवार दि.१२/५/२४ रोजी रात्री २२: १५ च्या दरम्यान राहुल कोल्हे पोलीस हवालदार हे कायदेशीर कर्तव्यावर असताना रोहन साळवे रा. कल्याण ता. हवेली जि. पुणे यांनी शासकीय इमारतीमध्ये विनाकारण प्रवेश करून राहुल कोल्हे पोलीस हवालदार यांच्या अंगावर येऊन समोरील खुर्ची उचलून काम करत असलेल्या कम्प्युटर वर फेकून नुकसान करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने खुर्ची डोक्यात घातली आणि त्यांना दुखापत केली.
ADVERTISEMENT
त्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे ५० हजार रुपयांचे नुकसान केले आहे.
म्हणून रोहन साळवे यांच्याविरुद्ध राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई पाटील करीत आहेत.


