भोर तालुक्यात ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत ७ पाणंद रस्त्यांना मान्यता
मंगेश पवार
भोर (पुणे):राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथरावजी संभाजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाड रायगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी मंत्री मा. ना. भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून भोर तालुक्यातील ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत सन २०२५–२६ या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.
या कामांसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख (पुणे) मा. गणेश शरदराव निगडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यामध्ये भोर तालुक्यातील न्हावी व भोंगवली गावांतील एकूण सात पाणंद रस्त्यांचा समावेश असून प्रत्येकी १ किमी लांबीचे रस्ते मंजूर झाले आहेत.
मंजूर कामांची यादी पुढीलप्रमाणे
मौजे न्हावी (ता. भोर, जि. पुणे): लक्ष्मीआई मंदिर ते कालीदास सोनावणे शेत — १ किमी
मौजे न्हावी: कालीदास सोनावणे ते कुमारभाऊ सोनावणे शेत — १ किमी
मौजे भोंगवली: सागर निगडे शेत ते जयसिंग भांडे शेत १ किमी
मौजे भोंगवली: पाण्याची टाकी ते देवडजाई धरण १ किमी
मौजे भोंगवली: देघु ते करंजाई माता मंदिर १ किमी
मौजे भोंगवली: राजेंद्र भांडे (माहूर) शेत ते दत्तात्रय भांडे शेत — १ किमी
मौजे भोंगवली: दिपक निगडे शेत ते चुनखडी शेत १ किमी
या रस्त्यांच्या कामांमुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यास सुलभता मिळणार असून शेतीमाल वाहतूक, पाणीपुरवठा व ग्रामीण दळणवळणात मोठी सुधारणा होणार आहे. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

गणेश शरदराव निगडे
शिवसेना पुणे जिल्हा उपजिल्हाप्रमुख


