भयंकर खूनाची घटना – सख्ख्या भावाचा खून; राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दि. 19 ऑगस्ट भोर – तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीत जुन्या कात्रज बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या डोंगरात अज्ञात इसमाने धारदार हत्याराने तरुणाची हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. 19 ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
संग्राम स्वामी आठवले (वय 28, रा.नऱ्हे, मानाजीनगर, हवेली) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून सौरभ स्वामी आठवले (वय 25, रा. मांगडेवाडी, पुणे) याचा खून अज्ञात इसमाने केला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्यापूर्वी शिंदेवाडी गावच्या डोंगराळ भागात कच्च्या रस्त्यावर सौरभ याच्यावर अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने धारधार हत्याराने वार करून खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशन येथे पो.हवालदार मदने यांनी गुन्हा दाखल केला असून, राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोसई पाटील करीत आहे.
या खुनामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपीचा शोध राजगड पोलिसांनी सुरु केला आहे.


