भोर तालुक्यातील महिलांचा डॉ. मंदार माळी यांच्या पुढाकारातून गौरव
मंगेश पवार
किकवी : जागतिक महिला दिनानिमित्त (८ मार्च २०२६) साई स्पर्श हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. मंदार माळी यांच्या वतीने भोर पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. ट्रॉफी, श्रीफळ व अल्पहार देऊन हा सत्कार करण्यात आला.
डॉ. मंदार माळी हे साई स्पर्श हॉस्पिटलचे प्रमुख असून ते भाजप उत्तर कार्यकारिणी उपाध्यक्ष, बीव्हीजी 108 इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर तसेच महाराष्ट्र सेल पुणे जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र सेल राज्य कार्यकारिणी उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
घर-संसार सांभाळत सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात सक्रियपणे कार्य करणाऱ्या आणि समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या महिलांचा या वेळी सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे महिलांच्या कार्याची दखल घेतली गेली असून समाजात त्यांच्या कामाबद्दल कौतुकाची लाट निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमात राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या हस्तेही महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खालील महिलांचा सत्कार करण्यात आला :
विजया महेश कोंडाळकर, छाया किरण भिलारे, मुक्ता तुळशीराम भिलारे, स्वाती प्रमोद पाटणे, मेघा राहुल निगडे, वैशाली खंडू मोहिते, प्रियांका प्रशांत निगडे, किरण दीपक निगडे, रोहिणी उमेश काकडे, रुपाली विलास लेकावळे, कल्पना आवळे, रुपाली संतोष बाठे, अंकिता विवेक बाठे, स्वाती साळुंखे, सपकाळ मावशी, पल्लवी उरसळ, आशा गुरव, मनीषा कांबळे, मेघा लोंढे, सुनंदा सुरेश माळी, मेघा माळी, माधुरी बाठे, सोनाली निगडे, वर्षा कदम.
महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून समाजातील महिलांचे योगदान मोठे आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


