नसरापूर येथून अज्ञात चोरट्याने मोटरसायकल चोरली.


 

प्रतिनिधी : भोर तालुक्यातील नसरापूर गावातून दुचाकी चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उदय भैरु जाधव वय 48 वर्ष रा. नसरापूर बनेश्वर पॅराडाईज यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आले आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल एम एच १२ एच जे ४६७६ ही दि.१५/४/२४ रोजी रात्री ९ :०० ते दि.१६/४/२४ सकाळी ०६:३० सुमारास नसरापुर तालुका भोर जिल्हा पुणे गावचे हद्दीतील बनेश्वर पॅराडाईज सोसायटी च्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. म्हणून उदय जाधव यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. कोंढाळकर करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!