राजापूर येथे मोफत नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद;
सारोळे प्रतिनिधी : ग्रामपंचायत राजापूर यांच्या पुढाकारातून व वरद विनायक नेत्र रुग्णालय, भोर व शिरवळ यांच्या सहकार्याने राजापूर येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 58 ग्रामस्थांनी नेत्रतपासणीचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये अनुभवी डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. तारू व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत बारकाईने व उत्कृष्ट सेवा देत ग्रामस्थांची तपासणी केली. त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानेश्वर माऊली बोबडे, बाळासाहेब बोबडे (माजी सरपंच), रामदास बोबडे (माजी सरपंच), ह.भ.प. बाळासाहेब खुटवड, ह.भ.प. रमेश माऊली बोबडे, दिलीप बोबडे, दिलीप बागल, प्रमोद बोबडे, गजानन बोबडे, संजय गाडे, संभाजी बोबडे, पंकज खुटवड, मुकेश भोंडवे, सुधाकर गुरगुडे (माजी उपसरपंच), भगवान भरगुडे, राजकुमार बोबडे, सचिन बागल व गणेश गुरगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच सरिता अजय बोबडे, वैशाली बोबडे, अदिती बोबडे, नंदिनी मोरे, द्वारका बोबडे, छाया गाडे व अनिता गाडे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवत शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सर्व ग्रामस्थ, डॉक्टर व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.


