अवैद्य धंदे बंद करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष भोर अध्यक्ष सागर यादव यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.
दि. 3 भोर पोलीस स्टेशनच्या हददीतील बेकायदेशीर दारू, गुटखा, ताडी, मटका, जुगार, हे धंदे तात्काळ कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष भोर अध्यक्ष सागर यादव यांनी भोर पोलीस ठाण्यासह पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.
भोर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात खुलेआम बेकायदेशीर दारू, गुटखा, ताडी, मटका, जुगार हे धंदे राजरोषपणे सुरू आहेत. त्यामुळे भोर तालुक्यातील बहुसंख्य लाडक्या बहिणींचे संसार उध्दवस्त झाले आहेत.
मागील 15 दिवसापूर्वी विजय मारूती शेडगे रा. अंगसुळे, ता. भोर, हा २४ वर्षीय युवक ताडी पिऊन मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. या मृत्युस जबाबदार असणाऱ्या बेकायदेशीर ताडी विक्रेत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व संबंधित बिट अंमलदारास तात्काळ निलंबीत करून बेकायदेशीर धंदयांना आर्थीक फायदयासाठी पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करावी.
भोर पोलीस स्टेशनच्या हददीतील पोलीसांच्या वरदहस्ताने बेकायदेशीर राजरोषपणे चालणारे दारू, गुटखा, ताडी, मटका, जुगार हे धंदे तात्काळ कायमस्वरूपी बंद न केल्यास व दोर्षीवर कार्यवाही न झाल्यास
दि. ६/५/२०२५ रोजी भोर पोलीस स्टेशन समोर राष्ट्रीय रिपब्लीकन पक्षाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करणार आहे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यांस सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील,
अशा आशयाचे निवेदन भोर तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी सासवड, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग सासवड यांना राष्ट्रीय रिपब्लिक पक्ष भोर तालुकाध्यक्ष सागर यादव यांनी दिले आहे.


