भोर तालुक्यातील जोगवडी गावातून जेसीबी चोरीस गेला.


भोर : तालुक्यातील जोगवडी गावातून जेसीबी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत जेसीबी मालक अनिल शिवाजी बोडके वय ३० वर्ष यांनी याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सोमवार दि. १० रोजी जोगवडी गावाच्या हद्दीतून जेसीबी नं. एम एब १२ जेके ११६५ हा अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. जेसीबी चालक शाहीजात गुलाब रसूल अन्सारी याने काळुबाई मंदिरासमोर पार्क केलेला होता.१००००० रुपये किमतीचा जेसीबी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून चोरून नेला आहे. म्हणून अनिल बोडके यांनी राजगड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

याचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मदने नाना करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!