खंडाळा तालुक्यातील आर पी आय कार्यकर्त्यांचा लोकजनशक्ती पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश! आगामी येणाऱ्या विधानसभेसाठी पक्षाची बांधणी.


 

खंडाळा प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे

 

सातारा जिल्हा अध्यक्ष विजयराव गायकवाड लेबर सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष करण गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष अविनाश महामुनी यांच्या उपस्थितीत व खंडाळा तालुका अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा तालुक्यातील इतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा लोक जनशक्ती पार्टी मध्ये जाहीर प्रवेश या मध्ये सविता सकपाळ किसन बोडरे अरुण कोळेकर अर्चना शिंदे नवनाथ कुंभार व अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश केला आहे.

या वेळी विनोद भिंगारे, पंकज कांबळे,विठ्ठल कांबळे, शेखर गायकवाड,देवा भोसले, महिला आघाडी प्रियांका भोसले,इंदूताई भिसे, भाग्यश्री कांबळे, वनिता पवार येवले वर्षा गायकवाड, सुनंदा येवले व अनेक कार्यकर्त्यांचा लोक जनशक्ती पार्टीमध्ये समावेश होता.

ADVERTISEMENT

यावेळी प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे अरुण गायकवाड यांनी स्वागत केले तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रत्येक अडचणी संपूर्ण शक्तीने मदत करण्याचे वचन देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा लोक जनशक्ती पार्टीमध्ये प्रवेश करणार असे खंडाळा तालुका अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी सांगितले.

 

लोक जनशक्ती पार्टीची ताकद खंडाळा तालुका मध्ये पूर्वी होती आणि आजही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. लोक जनशक्ती पार्टीचे पाच खासदार आता निवडून आले आहेत. दि.९ रोजी केंद्रीय मंत्री पदी चिराग पासवान शपथ घेणार आहेत.

लोक जनशक्ती पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष करण गायकवाड यांनी सर्व निवडून येणाऱ्या खासदारांचे अभिनंदन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!