पुणे नऱ्हे येथे चॅम्पियन्स कराटे क्लब कराटे स्पर्धेत “न्हावी “येथील प्रियांशु जगताप हिला दुहेरी यश.
दि. ७ पुणे : समृद्धी लॉन्स नऱ्हे येथे चॅम्पियन्स कराटे क्लब तर्फे आयोजित केलेल्या इन्व्हिटेशनल नॅशनल स्टेट कराटे चॅम्पियनशिप 2024 चॅम्पियन्स कप स्पर्धेमध्ये ७ वर्षाखालील वयोगटात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांची नात प्रियांशु उर्फ माई हिने कुमेंती या प्रकारात सुवर्णपदक गोल्ड आणि काथा या प्रकारात रौप्यपदक सिल्वर अशी एकुण २ पदके व कुमेंठी या प्रकारात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली आहे. त्याबद्दल प्रियांशु उर्फ माईचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
प्रियांशु उर्फ माईने तिच्या कारकिर्दीतील पहिल्या स्पर्धेमध्ये विजयी सुरुवात करून आत्तापर्यंत येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. या प्रवासात तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. अर्थात या यशामध्ये तिचे कठोर परिश्रम, नित्य सराव आणि शिस्त त्याबरोबरच प्रशिक्षक आणि आई-वडील यांचेही तितकेच योगदान आहे. माईचा खेळ असाच बहरत जावून पुढील प्रत्येक स्पर्धेत असेच भरघोस यश मिळवून सर्व क्षेत्रात सर्वोत्तम स्थान मिळो व नेहमी अजिंक्य रहावे अशाच शुभेच्छाचा वर्षाव सारोळे आणि न्हावी पंचक्रोशी तसेच समस्त भोर तालुक्याच्या वतीने प्रियांशू उर्फ माईवर होत आहे.