पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्यादित पुणे संचालक भालचंद्र जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून पुन्हा एकदा सी. एस. आर फंडातून माऊली अनाथाश्रमास आर्थिक मदत….
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज
मुख्य संपादक:मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
भोर: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्यादित, पुणेच्या (CSR) फंडातुन बॅंकेचे संचालक भालचंद्र जगताप यांनी स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ केळवडे यांचे समर्थ माध्यमिक विद्यालय केळवडे आणि श्री माऊली अनाथाश्रम निराधार सेवा ट्रस्ट माळेगाव (नसरापूर) यांना संगणक संच खरेदीसाठी प्रत्येकी ५०,०००/- रकमेचा धनादेश सुपूर्त केला. सदर धनादेश श्री. स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक – कार्याध्यक्ष व सेक्रेटरी पोपट जगताप व माऊली अनाथाश्रमचे सर्वेसर्वा हभप नवनाथमहाराज लिमण यांच्याकडे सुपुर्त केला.
प्रसंगी कार्यक्रमासाठी समवेत शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष व माजी जि. प. सदस्य शिवनाना कोंडे, भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती रामदास भांडे, भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, पुणे जिल्हा परिषदचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळकृष्णतात्या दळवी, केळवडे विकास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कोंडे, सचिव संपत जगताप, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव स्वप्निल कोंडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजेश खोपडे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे मा. अध्यक्ष तसेच केळवडे गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, उद्योजक सुरज कोंडे, नारायण कोंडे, रुपेश धाडवे, एकनाथ कोंडे, जयवंत कोंडे, बाळासाहेब कोंडे नथूतात्या कोंडे, रमेश कोंडे अशोक कोंडे, धनाजी धुमाळ, विलास मरळ, विशाल कोंडे, भरत कोंडे आदीसह मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.
मंडळाचे संस्थापक – कार्याध्यक्ष व सेक्रेटरी श्री.पोपटकाका जगताप व माऊली अनाथाश्रमचे सर्वेसर्वा हभप श्री. नवनाथ महाराज लिमण यांनी त्यांच्या संस्थेची आणि संस्थेने राबवविलेले विविध उपक्रमांबद्दल माहिती सर्वांना दिली.
यावेळी माननीय भाऊंनी मनोगत व्यक्त करताना दोन्ही संस्थांनी विद्यार्थी – शिक्षण आणि वारक-यांसाठी केलेल्या स्तुत्य उपक्रमांसाठी समाधान व्यक्त करून भविष्यात सुद्धा विद्यार्थ्यांसाठी अधिकची मदत करण्याचे आश्वासन दिले.
दोन्ही संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांना सन्मानित करुन त्यांचे आभार मानण्यात आले.


