पांडे राजापूर विविध सहकारी सोसायटीचा उत्कृष्ट कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव


मुख्य संपादक मंगेश पवार कार्यकारी संपादक सागर खुडे

सारोळे :- पांडे राजापूर विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये उल्लेखनीय अशी 99.25% वसुली पूर्ण करत आदर्श घालून दिला आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल सोसायटीचे चेअरमन महेश साळुंके, सचिव ऋषिकेश बोबडे व्हाइस चेअरमन बाळू यादव ,संचालक मंडळ शंकर साळुंके तसेच, व्हाइस चेअरमन, सचिव आणि संपूर्ण सदस्य मंडळ यांचा सन्मान समारंभ नुकताच भोर मध्ये पीडीसी बँकेच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ADVERTISEMENT

 

या विशेष कार्यक्रमात मा. आमदार संग्राम थोपटे, दिगंबर दुर्गाडे सर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप आणि इतर अनेक मान्यवरांच्या हस्ते संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. सोसायटीने ग्रामीण स्तरावर पारदर्शक व शिस्तबद्ध आर्थिक व्यवहार करून लोकांचा विश्वास मिळवला आहे, ही बाब उपस्थित मान्यवरांनी विशेषत्वाने उल्लेखली.

 

मा. भालचंद्र जगताप यांनी आपल्या भाषणात सांगितले, “शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या अशा सहकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. पांडे राजापूर सोसायटीने 99.25% वसुली करत उत्कृष्ट कार्य केले असून, इतर संस्थांसाठीही ही एक प्रेरणा ठरावी.”

 

सोसायटीचे चेअरमन यांनी सांगितले की, “ही यशस्वी वसुली एकट्या व्यवस्थापनाची नाही तर सर्व सभासद, कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या एकजूट व मेहनतीचा परिणाम आहे.”

सोसायटीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!