सारोळे-वीर रोड आंदोलन लेखी आश्वासनामुळे तात्पुरते स्थगित.
संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
१५ दिवसांत काँक्रिटीकरण न झाल्यास शिव प्रहार प्रतिष्ठानचा तीव्र आंदोलनाचा इशारा
दि. 6जून 25 सारोळे (ता.भोर) – सारोळे ते वीर रस्त्याची दुरवस्था आणि दीर्घकाळ त्यामुळे खराब झालेल्या रस्त्याचे प्रलंबित असलेले काँक्रिटीकरणाचे काम त्वरीत सुरू व्हावे, या मागणीसाठी शिव प्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आलेले आंदोलन सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाने १५ दिवसांच्या आत रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
या आंदोलनात सारोळे गावचे सामाजिक कार्यकर्ते साईनाथ धाडवे, बाबा भंडलकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पवार,राजापूर गावचे सरपंच बाळासाहेब बोबडे, पांडे गावचे सरपंच जितेंद्र साळुंके, सावरदरे गावचे सरपंच गणेश साळुंके, नवनाथ साळुंके, सहभाग घेतला होता. खराब रस्त्यामुळे नागरिकांना होत असलेले अपघात, वाहतुकीतील अडथळे व इतर समस्या लक्षात घेता, रस्त्याचे काँक्रिटीकरण तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, या रस्त्याच्या अमोल टिंबर शेजारी समोर बाजूस ड्रेनेजची सुविधा असावी, या मागणीसही गांभीर्याने दखल घेत ग्रामपंचायतीमार्फत ड्रेनेज लाईनची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही लेखी आश्वासन ग्रामपंचायतचे सरपंच रूपाली साईनाथ धाडवे यांनी दिले आहे.त्यामुळे पावसाळ्यात साचणारे पाणी, चिखल व दुर्गंधी या समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार १५ दिवसांच्या आत कामाला सुरुवात न झाल्यास शिव प्रहार प्रतिष्ठानच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा अध्यक्ष संतोष मोहिते दिला आहे.
तसेच राजगड पोलिस स्टेशनचे नाना मदने, गुले यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
शिव प्रहार प्रतिष्ठानचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने हा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहेत. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अन्यथा उग्र आंदोलन अटळ राहील, असा सजग इशाराही यावेळी देण्यात आला.
— शिव प्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष मोहिते


