अभिषेक वैराट यांनी फोडला प्रशासन आणि स्थानिक नेत्यांना घाम.
उपसंपादक : सागर खुडे
सार्वजनिक बांधकाम विभागातील अकार्यक्षम आधिकारी यांचें कार्यशैलीची पद्धत जनसामान्यांच्या जीवावर बेतणारी ठरत आहे.मागील काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीतर्फे भोर-राजगड(वेल्हे) तालुक्याचे नेते अभिषेक संतोष वैराट यांचें नेतृत्वात खेडशिवापूर टोंलनाकावरील स्थानिक नागरिकांकडून केली जाणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी तसेच रस्त्यांची झालेली निकृष्टता आणि रस्ते विकास प्राधिकरण(NHAI) कडून कामाचा घसरलेला दर्जा, रस्त्यावरील मोठमोठे पडलेले खड्डे ज्यामुळे अनेक नागरिकांचा अपघाती मृत्यू झाल्याचे आढळून आल्याचे घटना वारंवार घडत आहेत.यासंदर्भात आवाज उठवला असताना प्रशासन अधिकारी निश्चिंतपणें झोपलेलं आहेत असा प्रकार समोर आला.थोडक्यात काय तर ही संपूर्ण यंत्रणा पैशाच्या अमिषावर काम करते असे स्पष्ट झाले.याच गचाळ कारभारविरोधात ठोस निर्णय पूराव्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग भोर व राजगड(वेल्हे)तालुक्यातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत दि.रोजी १५जुलै२०२४ रोजी संबंधीत विभागास पत्रव्यवहार करून जाहीर आंदोलनं पुकारले.
आणि पुनश्च एकदा नियोजित दिनी वंचितचे बहुजन आघाडी भोर राजगड(वेल्हे) तालुक्याचे नेते अभिषेक वैराट यांच्या नेतृत्वाखाली भोर राजगड(वेल्हे)तालुक्यातील त्रस्त नागरिकांनी संघटन करीत चेलाडी नसरापूर याठिकाणी प्रशासनाविरोधी प्रतिकात्मक आंदोलन केलं. सदर ठिकाणी नियोजित दिनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गाडे आंदोलन स्थळी आंदोलकर्त्यांची भेट घेऊन चेलाडी ते राजगड रस्ताचा प्रश्न येत्या १५ दिवसाच्या आत(१ऑगस्ट२०२४)काम पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.
त्यामुळे संबंधित आंदोलन या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
आंदोलनं प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रज्योत कदम,स्वप्नील गाडे,राजु खुडे, आनंद खुडे,निखिल भंडारी, पॅंथर गायकवाड,नितेश चव्हाण, वासमाने,देवा भंडारी,ओंकार तांबेकर,प्रसाद जाधव
यांसह भोर,राजगड (वेल्हे) तालुक्यांतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा.
संपादक: मंगेश पवार
मोबाईल नंबर: ९८३४२४५०९५
उपसंपादक सागर खुडे
मोबाईल नंबर: 91461 34789


