कराड शहरातील कुख्यात गुन्हेगार वरती मोक्का अंतर्गत कारवाईचा पोलीस महासंचालकाचा आदेश.


संपादक : मंगेश पवार

सातारा जिल्हयाचा पोलीस अधीक्षक यांनी कार्यभार स्विकारल्यापासुन अनेक मोठ्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उभारुन सातारा जिल्हयातील गुन्हेगारी विश्वाचा बिमोड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामध्ये शहर व परिसरातील अनेक गुन्हेगार पोलीस विभागाचे हिटलिस्टवर आहेत. त्यापैकीच एक सोमा ऊर्फ सोमनाथ ऊर्फ आण्णा अधिकराव सुर्यवंशी (टोळी प्रमुख) व त्याचे दोन साथीदार रविराज ऊर्फ गुल्या शिवाजी पळसे व आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी सर्व रा. हजारमाची ता. कराड जि. सातारा यांचेविरुध्द मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९) अन्वये दाखल गुन्हयांस मा. अपर पोलीस महासंचालक, साो (कायदा व सुव्यस्था) महा. राज्य मुंबई यांची दि.११/०६/२०२४ रोजी परवानगी प्राप्त झाल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.

 

मौजे हजारमाची ता. कराड ग्रामपंचायत सदस्य व कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगार सोमा ऊर्फ सोमनाथ ऊर्फ आण्णा अधिकराव सुर्यवंशी याचेविरुध्द यापुर्वी कराड शहर व पुणे येथे वैयक्तिक व टोळीने असे असे एकुण मिळुन १३ गुन्हे यापुर्वी दाखल आहेत. त्यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, गर्दी मारामारी, जुगार, अपहरण, सरकारी नोकरांवरील हल्ले व अवैध अग्निशस्त्र बाळगलेबाबत इ. गुन्हयांचा समावेश आहे. मा. पोलीस अधीक्षक साो सातारा व मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणे भादवि कलम ३०७,३८७,३२६,३२४५०४,५०६,३४ आर्म अॅक्ट ४/२५ या निष्पन्न आरोपी टोळी प्रमुख सोमा ऊर्फ सोमनाथ ऊर्फ आण्णा अधिकराव सुर्यवंशी टोळी सदस्य रविराज ऊर्फ गुल्या शिवाजी पळसे व आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी सर्व रा.हजारमाची ता. कराड जि. सातारा यांचेविरुध्द मा. विशेष पोलीस महानिरीक्षक साो, कोल्हापुर यांचेकडे मोक्का अंतर्गत कलमवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास मा. विशेष पोलीस महानिरीक्षक साो, कोल्हापुर यांनी मंजुरी दिल्यानंतर सदर गुन्हयामध्ये मोक्का अंतर्गत कलमांचा समावेश करण्यात आला. तदनंतर अमोल ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांनी गुन्हयाचा पुढील सखोल तपास करुन, आरोपींविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्याची पुर्व परवानगी मिळण्याबाबत मा. अपर पोलीस महासंचालक साो (कायदा व सुव्यवस्था) महाराष्ट्र राज्य यांचेकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला दि.१०/०६/२०२४ रोजी मंजुरी प्राप्त झाली असुन, नमुद तिन्ही आरोपींविरुध्द आज रोजी मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

 

कराड शहर व परिसरातील आणखी काही कुख्यात गुन्हेगार पोलीस विभागाचे निशाण्यावर असुन, त्यांच्या हिंसक व गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असुन, कराड शहर व परिसरामध्ये आगामी काळात देखील अशा प्रकारच्या कारवाया सुरु राहणार असल्याचा सुचक इशारा समीर शेख पोलीस अधीक्षक साो सातारा, श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, अमोल ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेला आहे.

 

समीर शेख, मा.पोलीस अधीक्षक साो सातारा, श्रीमती आंचल दलाल, मा. अपर पोलीस अधीक्षक साो सातारा यांनी सदर मोक्का कारवाई अनुषंगाने अमोल ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड (तपासी अंमलदार), अरुण देवकर, पो.नि.स्थागुशा सातारा, कोंडीराम पाटील व.पो.नि.कराड शहर, प्रदिप सुर्यवंशी, तत्कालीन व.पो.नि.कराड शहर, संदिप शितोळे, सहा.पो.नि., अमित बाबर, सहा.पो.नि., अनिल पाटील पो.उ.नि., तसेच पोलीस अंमलदार, असिफ जमादार, अनिकेत पवार, संजय देवकुळे, संतोष सपाटे, महेश लावंड प्रशांत चव्हाण, प्रविण पवार, अमित सपकाळ, सागर बर्गे, दिपक कोळी, आनंदा जाधव, धीरज कोरडे, सोनाली पिसाळ यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!