कराड डी. बी. पथकाची धडाकेबाज कारवाई! सराईत मोटरसायकल चोराला ठोकल्या बेड्या! तब्बल १५ लाख 30 हजार रुपये किमतीच्या १७ मोटरसायकल केल्या जप्त.


 

सातारा प्रतिनिधी :

समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर यांनी कराड शहरात तसेच उप नगरात होणाऱ्या मोटर सायकल चोरी बाबत विशेष आढावा घेवुन कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक के. एन. पाटील सो. यांना मोटर सायकल चोरीच्या गुन्हयाचा तात्काळ छडा लावणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील सो. यांनी व्यूह रचना तयार केली. आणि सदर कारवाईस मोठे यश मिळून कराड डी. बी. पथकाने एका सराईत मोटर सायकल चोरास मोठ्या शिताफीने अटक् करुन 15 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 17 मोटर सायकल जप्त केल्या आहेत. मागील काही वर्षातील चोरीच्या मोटर सायकल जप्त करण्याची ही सर्वात् मोठी कारवाई मानली जात आहे.

 

दिनांक 13/05/2024 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील सो. यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक यांना कराड शहर तसेच उप नगरात गस्त करणेबाबत आदेशित केले होते. सायकांळी १७:३० वाजताचे सुमारास आगाशिवनगर परिसरात गस्त करीत असताना एक इसम संशयीत रित्या मोटर सायकल वर फिरताना दिसुन आला पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याचे ताब्यातील मोटर सायकल कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतुन चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीस पोलीस ठाणेस आणुन पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील यांनी त्यांचे तपास कौशल्याचा वापर करुन डी. बी. पथकाचे मदतीने अधिक तपास केला असता नमुद आरोपीने कराड शहर व इतर पोलीस ठाणे हद्दीतुन एकुण 17 मोटर सायकल चोरी केल्याचे सांगितले होते. अटक करण्यात

ADVERTISEMENT

 

आलेल्या आरोपीचे नाव-प्रकाश बाबासो निंबाळकर वय ४५ वर्षे रा. मौजे सांगाव ता. कागल जि. कोल्हापुर असे असुन त्याचे ताब्यातुन पुढील प्रमाणे 15 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या एकुण 17 मोटर सायकली जप्त करत कराड शहर पोलीस ठाणेचे पुढील गुन्हे उघड केले आहेत.

 

1) MH11 AR 9065,

 

3) MH 50 Q 0183

 

5) MH 50B 3417

 

7) MH 50 Q 7788

 

9) MH 50K 4090,

 

11) MH 50 P 4925,

 

13) वडगाव पोस्टे MH09DY0582,

 

15) नबंर प्लेट नसलेली चेसिस नबरं 06J1C38851 17) गोकुळ शिरगाव पोस्टे

 

 

 

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील सो, सफौ रघुवीर देसाई, नागनाथ भरते पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, बाळासाहेब जगदाळे, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोषा पाडळे, अनिल स्वामी, पो.शि. महेश शिंदे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे. संग्राम पाटील यांनी केलेली आहे.

 

MH 50 F 9702

 

MH 50 K 3779

 

MH 50 Η 5332

 

MH 09DB 1048,

 

MH 11BM 268

 

MH 09 DN 0582.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!