पोलीस सेवेत नेहमीच प्रयत्नशील, कायदा सुव्यवस्थेला प्रथमता प्राधान्य:- स.पो.नि. कल्याणी वर्मा
संभाजी पुरी गोसावी
जळगांव जिल्हा पोलीस दलातील पाचोरा तालुक्यांतील पिंपळगांव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सौ. कल्याणी ताई वर्मा या पोलीस सेवेत नेहमीच प्रयत्नशील, आणि धाडसी,कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अगदी सर्वसामान्यांच्या मनातल्या महिला अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात. सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. कल्याणी ताई वर्मा या पोलीस सेवेत रुजू झाल्यापासून त्यांनी आजपर्यंत महत्त्वांच्या विविध पदावर उल्लेखनीय सेवा बजावली आहे. सध्या त्या पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तेथील पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून त्यांनी आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यावर अधिक भर दिल्यामुळे त्यांच्या कार्याचे जनतेतून देखील विशेष कौतुक होत आहे. पिंपळगांव हरेश्वर पोलीस ठाण्यात त्यांच्या एन्ट्रीमुळे आजपर्यंतच्या इतिहासात धाडसी आणि कर्तव्यदक्ष महिला अधिकारी मिळाल्याचे सूर उमटत आहेत. सध्या परिसरांत अवैधरित्या व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. अशा या त्यांच्या पोलीस सेवेला रोखठोक महाराष्ट्र धमाका ग्रुप कडूंन शुभेच्छा आहेत.


