भोर तालुक्यातील कापूरव्होळ येथे विजेच्या तारेचा शॉक लागून एक जणाचा मृत्यू.
कापूरव्होळ ता. भोर जि. पुणे येथील शेतामध्ये विजेच्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये गोरक्षनाथ शांताराम अहिरे वय ४७ वर्ष यांनी खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूरव्होळ येथील शेतामध्ये गुरुवार दि. १८ रोजी सकाळी १० च्या सुमारास गोरक्षनाथ अहिरे हे गवत काढण्याकरता गेले असता त्यांना त्यांचा चुलत भाऊ मच्छिंद्र बबन अहिरे वय ४२ वर्ष हा त्यांच्या शेतातील जमीन गट नंबर २४६ मध्ये आंब्याच्या झाडाच्या जवळ पडलेले होते. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये इलेक्ट्रिक खांबावरून खाली पडलेली तार होती.
गोरक्षनाथ अहिरे यांनी लगेच संजय गोरड वायरमन यांना सदर झालेला प्रकार सांगून वीजपुरवठा बंद केला आणि मच्छिंद्र अहिरे यांच्या सख्ख्या भावाला आणि शेजारी राहणाऱ्या समीर गाडे यास फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले.
घटनास्थळी सर्वजण आल्यानंतर मच्छिंद्र अहिरे यास गाडीमध्ये उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल नसरापूर येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी तपासून तो तपासणीपूर्वीच मयत झाला आहे असे सांगितले.
राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मदने नाना तपास करीत आहेत.


