कोयना सहकारी बँकेच्या नवीन प्रशासकीय कार्यालयास शंभूराज देसाई यांची सदिच्छा भेट


 

उपसंपादक : दिलीप वाघमारे

कराड येथील कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे गुरुवार दि. १८ रोजी उद्घाटन आणि बँकेच्या आवारात स्व. विलास पाटील-उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण अलीकडेच संपन्न झाले. पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी आज कोयना सहकारी बँकेच्या नवीन प्रशासकीय कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई यांनी स्व. विलास पाटील-उंडाळकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यांचा हा पूर्णाकृती पुतळा नव्या पिढीला कायम प्रेरणा देत राहील, अशी भावना मा. ना. शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच त्यांनी बँकेच्या नवीन प्रशासकीय कार्यालयाबद्दल संबंधित पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ADVERTISEMENT

 

यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यासह बँकेचे पदाधिकारी व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!