भांबवडे येथील शेखर कापरे व अर्चना कापरे पती-पत्नीची पोलीस पदी निवड! निलेश सोनवणे यांनाही सहाय्यक वनरक्षक अधिकारी बढती ( क्लास वन अधिकारी )


 

सारोळे : बिकट परिस्थितीचा सामना करीत भांबवडे (ता.भोर ) येथील शेतकऱ्याचा मुलगा शेखर हनुमंत कापरे याने मेहनत व जिद्दीच्या जोरावर वर्दीचा राजमार्ग सुकर केला व सोबत पत्नी अर्चना शेखर कापरे यांनाही भरतीसाठी प्रोत्साहन केले.

 

शेखर कापरे यांची मीरा-भाईंदर येथील उत्तन सागरी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस शिपाई पदी निवड २०२१ला निवड झाली. पोलीस झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला पोलीस भरतीसाठी प्रोत्साहन दिले.

अर्चना कापरे यांना शेखर कापरे यांच्या पाठिंबा आणि मार्गदर्शनाने पोलिस होण्याचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. कापरे कुटुंबातल्या या दांपत्याच्या यशाची भोर तालुक्यात तसेच पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. शेखर कापरे यांच्या भावाची पत्नी सोनाली कापरे या खंडाळा पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. एकाच घरातील तीन व्यक्ती प्रशासकीय सेवेत कार्य बजावत आहेत.निवड झाल्याचे कळतात गावात गुलाल उधळत आनंद साजरा केला.त्यांची निवड झालेली कळताच मा.जि.प. सदस्य शलाका कोंडे, युवा मा.सरपंच विकास चव्हाण तसेच प्रहार जनशक्ती पक्ष ता. उपाध्यक्ष अजय कांबळे यांनी त्यांच्या घरी जाऊन दोघांचाही सत्कार केला.

तसेच भांबवडे गावातील निलेश जगन्नाथ सोनवणे यांचीही फॉरेस्ट खात्यामध्ये क्लास वन अधिकारी म्हणूनबढती मिळाली आहे. त्यांना सहाय्यक वनसंरक्षक (ACF )

ADVERTISEMENT

Assistant Conservator of Forest पदी बढती मिळाली आहे.

निलेश सोनवणे फॉरेस्ट खात्यामध्ये नोकरीला असल्याने त्यांना यावेळी येतान आल्याने त्यांच्या वडिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

 

त्यांच्या यशाने अनेक तरुण तरुणींना प्रेरणा मिळणार आणि पोलीस आणि वनसंरक्षण फॉरेस्ट खात्यामध्ये भरतीसाठी आवड निर्माण होईल. व्यायाम आणि अभ्यास करून कोणताही क्लास न लावता व अकॅडमीत न जाता त्यांनी हे यश संपादन केले आहे. असे प्रसारमाध्यमांना त्यांनी सांगितले.

 

यावेळी जि. प. सदस्य शलाका कोंडे,प्रहार जनशक्ती पक्षउपाध्यक्ष अजय कांबळे,मा. युवा सरपंच विकास चव्हाण,भांबवडे सरपंच माधवी किरण सोनवणे,नयन कल्याणराव सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य व संचालक विघ्नहर्ता पतसंस्था राहुल कापरे, सामाजिक कार्यकर्ते किरण सोनवणे,सचिन सोनवणे, मनोज शिळीमकर, गणेश अडसूळ, पोलीस पाटील महेश अडसूळ,हरिश्चन चव्हाण,चंदू चव्हाण,मेघराज चव्हाण,

पूजा शिळीमकर, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

 गावातील निलेश सोनवणे आणि शेखर कापरे, अर्चना कापरे यांना मिळालेल्या या यशामुळे गावातील मुलांना तसेच पंचक्रोशी मध्ये मुला मुलींना पोलीस,आर्मी आणि वनसंरक्षण खाते यामध्ये भरती होण्यासाठी आवड निर्माण होईल.

या यशानेभांबवडेगावाचेनावउज्वलझालेआहे.यांचीनिवडझाल्याचेसमजताच गावात ग्रामस्थ नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी जल्लोष साजरा केला.

माधवी सोनवणे सरपंच भांबवडे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!