मोरवाडीची ईश्वरी मोरे वर्ड पॉवर चॅम्पियनशिप स्पर्धेत राज्यात तिसरी 


किकवी :- मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची इंग्रजीची गुणवत्ता वाढवण्यासाठी लीप फॉरवर्ड या संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने तयार केलेला आकलनासह इंग्रजी वाचन हा उपक्रम महाराष्ट्रभर दरवर्षी राबवत असते. यात भाग घेणाऱ्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या १३ हजार विद्यार्थ्यांसाठी यंदा घेण्यात आलेल्या वर्ड पॉवर चॅम्पियनशिप स्पर्धेत मोरवाडी (ता.भोर) येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवीच्या ईश्वरी मनोज मोरे हिने महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळवला आहे.

ADVERTISEMENT

 

मुंबईहून पोस्टाने प्राप्त झालेल्या बक्षिसाचे वितरण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते शाळेत करण्यात आले. बक्षिसामध्ये स्टडी टेबल, टिफिन बॉक्स, मिल्टन वॉटर बॉटल, स्कूल बॅग, मेडल व प्रमाणपत्राचा समावेश होता. याशिवाय प्रांजल जालिंदर साळुंके हिला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक आल्याबद्दल बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात आले.

 

शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, गटशिक्षणाधिकारी सचिन लोखंडे यांच्या प्रेरणेतून विस्तार अधिकारी सुनीता गायकवाड, केंद्र प्रमुख साधना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका वैशाली सुतार, वर्गशिक्षक अरुण होडशिळ यांचे मार्गदर्शन लाभले. तर शिक्षक बाळासाहेब गायकवाड, सुरेश जाधव यांचे सहकार्य लाभले. सरपंच,उपसरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!