पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी मिरज शहर पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला, मिरज पोलीस ठाणेला पुन्हा मिळाला खमक्या अधिकारी तर पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांची विनंतीवरून बदली,
संभाजी पुरीगोसावी (सागली जिल्हा) प्रतिनिधी. सांगली जिल्हा पोलीस दलात मागील दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरज शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांची विनंतीवरून बदली करण्यात आली होती, तर त्यांच्या रिक्त जागेवर जत पोलीस ठाणेचे अतिरिक्त प्रभारी म्हणून कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांची मिरज शहर पोलीस ठाणेत नियुक्ती करण्यात आली होती, पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी मंगळवारी सकाळी मिरज शहर पोलीस ठाणेत हजर राहून पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांच्याकडूंन आपला पदभार स्वीकारला आहे, पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी मिरज शहर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, पोलीस निरीक्षक किरण रासकर यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

