शाळेची मुले घेऊन जाणारी स्कूल व्हॅन पलटी
उपसंपादक : दिलीप वाघमारे
पाडेगाव तालुका खंडाळा गावचे हद्दीत गिरमेवस्ती नजीक स्कूल व्हॅन पलटी होऊन व्हॅन मध्ये 10ते 12वयोगटातील पाच मुले व सात वर्षाची मुलगी किरकोळ जखमी झाली आहेत ही स्कूल व्हॅनमध्ये लोणंद येथील एका इंग्रजी स्कूलवर मुले घेऊन सोडायला चालली होती या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहीती अशी की शुक्रवारी 8.00 वाजण्याचे सुमारास पाडेगाव तालुका खंडाळा गावचे हद्दीत पाडेगाव बाजू कडून गिरमे वस्ती कडे स्कूल व्हॅन तिचा आरटीओ क्रमांक MH 12 WZ 0478 पांढऱ्या रंगाची ही रोडच्या डाव्या बाजूला एका बाजूवर पलटी झाली आहे सदर अपघातामध्ये अंदाजे 10 ते 12 वर्षे वयोगटातील एकूण पाच मुले व एक सात वर्षाची मुलगी किरकोळ स्वरूपात जखमी आहेत गाडीचे चालक जैद मुनिरखान डांगे वय 24 वर्षे रा वॉर्ड नंबर 03 निरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे यास लोणंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अपघात ग्रस्त वाहन पोलीस ठाणे आवारात लावण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार भिसे हे करीत आहेत.