भोर तालुक्यातील होतकरू खेळाडूंना मोफत क्रिकेट प्रशिक्षणाची संधी.


मंगेश पवार

भोर :-गरीब, गरजू व होतकरू लहान क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी पद्मश्री अजित वाडेकर क्रिकेट अकॅडमी, खेड-शिवापूर यांच्या वतीने १० वर्षे वयोगटातील मुलांना मोफत क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. क्रिकेट खेळात आवड असलेल्या आणि सरावासाठी वेळ देणाऱ्या खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकॅडमीकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, भोर तालुक्यातील दोन मुलींनी क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. भोर शहरातील श्रावणी रावळ व अंबाडे गावची स्वरा गाडे या दोघींची १५ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. या दोन्ही खेळाडूंनीही पद्मश्री अजित वाडेकर क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे.

ADVERTISEMENT

या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ व्हॉट्सअॅप ग्रुप च्या वतीने श्रावणी रावळ व स्वरा गाडे यांचा सन्मान करण्यात आला होता. अलीकडेच अकॅडमीचे प्रशिक्षक राजू मुजावर यांच्याशी संवाद साधताना त्यांनी ग्रुपच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. होतकरू युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच श्री स्वामी समर्थ व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्यांना पद्मश्री अजित वाडेकर क्रिकेट अकॅडमी येथे भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!