गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींच्या सिंहगड रोड पोलिसांनी आवळल्या मुसक्या ,सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी.
संभाजी पुरीगोसावी ( पुणे शहर ) प्रतिनिधी.
सिंहगड रोड पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये एक इसम बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे घेवुन फिरत असल्यांची माहिती पोलीस ठाणेकडील स्वप्निल मगर व पोलीस अंमलदार विनायक मोहिते यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सदर माहिती स.पो.नि. सचिन निकम यांना दिली असता. सिंहगड रोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही कारवाईबाबत तपासी पथकाला सूचना दिल्या होत्या. सदर ठिकाणी जावुन पोलिसांनी खांस जवळकीच्या गोपनीय बातमीदारांच्या प्राप्त माहितीवरून सिंहगड रोड पोलिसांनी अखेर धायरी नन्हे परिसरांत रेकॉर्डवरील आरोपींच्या आवळल्या मुसक्या आहेत. याप्रकरणी राज रवींद्र जागडे (वय 22) रा. आझाद मित्र मंडळ चरवडवस्ती वडगांव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. सदर आरोपी राज रविंद्र जागडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्यांच्यासमवेत दोन विधीसंघर्ष बालके ही मिळून आले आहेत. सदर आरोपींच्या कब्जांतून जवळपास 40. 000 / रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार रंजन कुमार शर्मा सह पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त संभाजी कदम पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 अजय परमार सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघवेंद्रसिंह क्षीरसागर उत्तम भजनावळे गुन्हे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकांचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आबा उतेकर पोलीस अंमलदार संजय शिंदे उत्तम तारू पंकज देशमुख अमोल पाटील विनायक मोहिते स्वप्निल मगर शिवाजी क्षीरसागर राहुल ओलेकर देवा चव्हाण सागर शेडगे विकास पांडुळे विकास बांदल आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.


