शिवप्रहार प्रतिष्ठानकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनास तात्पुरती स्थगिती
कार्यकारी संपादक : सागर खुडे
शिवप्रहार प्रतिष्ठानचें वतीने बांधकाम विभागाला मागील काही दिवसांपूर्वी सारोळे ते वीर आणि भोंगवली ते माहूर खिंड रस्ता दूरुस्तीकरण, वाहतुकीसाठी अडथळा होणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेली झाडं, अडगळ हटविणे आणि गटर लाईन टाकणे सोबत मुरूम खडी ने भरलेले खड्डे एसफाल्ट बँग्ज तसेच विमरसेल, जीएसबी सारखी उच्चदर्जाची जी केमिकल आहेत जी खड्ड्यांच्या दीर्घकाळ टिकण्याकामी वापरण्यात येतात ती वापरून त्या प्रमाणे काम करण्यात यावे अशी मागणी आपले निवेदन पत्रात नमूद करण्यात आली होती. परंतु १४ऑगस्ट रोजी झालेल्या समक्ष बैठकीत झालेल्या चर्चेत सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अधिकारी वागज आणि हराळे साहेब यांनी कायदा अणि सुव्यवस्था अबाधित राखणेप्रश्नी लेखी स्वरूपात आश्वासन दिले.तसेच या बैठकीत भोंगवली ते माहूर खिंड यासाठी एकूण ८कोटी एवढा भरगोस निधी मंजुर करण्यात आला आहे असा गौप्यस्फोट करीत पुढील अपुरी कामे वर्कऑर्डर नुसार येत्या १५दिवसांच्या आत पूर्ण करण्यात येईल असा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे शिवप्रहार प्रतिष्ठानतर्फे सारोळे ते टापरेवाडी रत्यावरील फाट्यावर जे १५ऑगस्ट २०२४ रोजीचे शोले स्टाईल रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते, ते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले असून याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री संतोष मोहिते यांनी केले आहे.


