भोर तालुक्यातील पाचलिंगे गावात बिबटयाच्या हल्ल्यात वासरू ठार..
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक :सागर खुडे
पाचलिंगे गावात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली रविवारी( दि. १८) रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली असून बिबट्याने गोठ्याशेजारी बांधलेल्या वासरावर हल्ला केला. शेजारील गाईच्या हंबरड्याने शेतातील रामचंद्र जाधव यांनी आरडाओरड करून वासराला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बराच उशीर झाल्याने वासरू मरण पावले होते.गेल्या ३ महिन्यापासून मोरवाडी गावासह पाचलिंगे गावच्या आसपासच्या परिसरात बिबट्याचे दर्शन वेळोवेळी होत आहे. यापूर्वी ही मोरवाडी येथे शेळ्यांवर व कुत्र्यावर हल्ला झाला झालेच्या घडना ऐकण्यात आल्या असून या परीसरात वारंवार बिबट्याचे हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या बातमीबद्दल सविस्तर वृत्त असे की रविवारी सायंकाळी पाचलिंगे येथील रामचंद्र जाधव यांच्या गोठ्या शेजारी वासरू चरत असताना बिबट्याने अचानक येऊन त्यावर हल्ला केला. रामचंद्र जाधव यांच्या आवाजाने गोठ्यातील अंकुश जाधव हे बघावयास गेले असता त्यांना बिबट्या वासरू खातांना दिसला. त्यांनी आरडाओरडा केला असता व परिसरातील लोक जमा झाल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. वासराने तोपर्यंत प्राण सोडलेले होते. अशा घटनांमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूजचे मुख्यसंपादक यांनी वनखात्याला संपर्क केला असता त्यांनी सोमवारी.दि१९ रोजी सकाळी येऊन पंचनामा करणार असे सांगितले.


