शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद येथील दहा विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यू मध्ये निवड
संपादक :दिलीप वाघमारे
लोणंद: येथील रयत शिक्षण संस्थेचे शरदचंद्र पवार महाविद्यालय, लोणंद येथे करियर कौन्सलिंग व प्लेसमेंट सेल विभाग, महाविद्यालयातील आयक्यूएससी विभाग तसेच आय. बी. एफ. स्किल अकॅडमी कोल्हापूर यांच्या वतीने शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये बिजनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह व सेल्स ऑफिसर या पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकेमध्ये वार्षिक मानधन दोन लाख आडतीस हजार देण्यात येणार आहे. यावेळी आय. बी. एफ. स्किल्स अकॅडमी कोल्हापूरचे असिस्टंट मॅनेजर श्री. प्रणव कापसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले, ” आमच्या बँकेत विविध पदावर काम करण्यासाठी अनेक होतकरू विद्यार्थ्यांची गरज आहे, त्यासाठी आम्ही शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद येथे विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी आलो आहोत. बँकेमध्ये तीस टक्के महिलांना संधी देणार आहोत. विद्यार्थ्यांना रोजगाराबरोबर स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी मिळावी ही भूमिका आमची आहे. आम्ही टेस्ट व इंटरव्ह्यू घेऊन विद्यार्थ्यांची निवड करणार आहोत. निवडीसाठी विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्त्व विकसित करणे आवश्यक आहे.” यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, आयक्यूएससीचे समन्वयक डॉ. सागर शेंडे, करियर कौन्सलिंग व प्लेसमेंट सेल विभागाचे प्रमुख प्रा.संदीप कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. आय. बी. एफ. स्किल्स अकॅडमी कोल्हापूरच्या वतीने ११५ विद्यार्थ्यांची टेस्ट व इंटरव्ह्यू घेण्यात आली. त्यामधून सर्वोत्तम १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रा. आर. जे. नाळे, प्रा. सुभाष कदम, डॉ. बाबासाहेब सायमोते, डॉ. स्वप्निल बनकर, प्रा. अनिकेत धायगुडे, प्रा. श्रीकांत शिंदे, प्रा. शुभम जाधव, प्रा. अमृता काळोखे महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. छाया सकटे व प्रा. पायल घोरपडे यांनी केले व मान्यवरांचे आभार प्रा. एम. डी. नायकू यांनी मानले.


