सारोळे येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन १७ वर्षीय युवकांचा दुर्दैवी मृत्यू


सारोळे प्रतिनिधी : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सारोळे (ता. भोर) येथील हॉटेल नवलाई समोर झालेल्या भीषण अपघातात दोन 17 वर्षीय युवकांचा मृत्यू झाल्याची घटना 1 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.15 वाजता घडली.

राजगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल फिर्यादीनुसार, तुषार दादासाहेब शिंदे (वय 17, रा. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) व त्याचा मित्र अथर्व विजय पाटील (वय 17, रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) हे मोटारसायकल (क्र. MH-12 ZR 5238) वरून नसरापूरहून शिरवळच्या दिशेने जात होते.

दरम्यान, सारोळे गावच्या हद्दीत हॉटेल नवलाई समोर अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवत मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात तुषार शिंदे व अथर्व पाटील यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने जखमींना उपचारासाठी न नेता तसेच अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी फिर्यादी राजेंद्र गोविंद नेवसे (वय 38, व्यवसाय शेती, रा. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!