बारामती लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ न्हावी येथे घोंगडी बैठक! रविवारी ५ मे रोजी भोर येथे अजित दादा पवार यांची जाहीर सभेसाठी येण्याचे आवाहन.
मंगेश पवार
सारोळे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रचारानिमित्त भोर तालुक्यातील पूर्व भागातील न्हावी सर्वे नंबर 322 येथे घोंगडी बैठक घेण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली, त्यावेळी मार्गदर्शन करताना येत्या रविवारी ५ मे रोजी सकाळी ९:०० वाजता भोर येथे राज्याचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या भोर येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले. समवेत राजगड सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रवि सोनवणे, शिवसेनेचे युवा नेते तसेच उद्योजक विकासबापू चव्हाण, बाळासाहेब सोनवणे उर्फ बाळु गुलाब सोनवणे, न्हावी विकास सोसायटीचे माजी चेअरमन तसेच भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र सुरेश सोनवणे, न्हावी विकास सोसायटीचे चेअरमन नवनाथ सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, जितेंद्र सोनवणे, प्रहार संघटना भोरचे उपाध्यक्ष अजय कांबळे, शिवाजी सोनवणे, महादेवमास्तर सोनवणे, बापूसो नामदेव सोनवणे, दत्तात्रय जाधव, संदीप सोनवणे, मंगेश सोनवणे, पै. सोमनाथ सोनवणे, उदय कोंडे, न्हावी विकास सोसायटीचे संचालक अवधूत सोनवणे, न्हावी विकास सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन शिवाजी सोनवणे, न्हावी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रसाद सोनवणे, नागेश नलावडे, शैलेश जगताप, विकास सोसायटीचे संचालक रामदास सोनवणे, न्हावी विकास सोसायटीचे माजी चेअरमन महादेव सोनवणे, प्रकाश सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे, सुमंत सोनवणे, जयवंत सोनवणे, युवा उद्योजक तुषार खोपडे, निलेश सोनवणे, आबा कोंडे, गौरव लोहमकर, संदीप सोनवणे आदी युवा कार्यकर्ते यांच्यासह अनेक ज्येष्ठ मतदार उपस्थित होते त्याबद्दल न्हावी सर्वे नंबर १५ आणि न्हावी सर्वे नंबर ३२२ ग्रामस्थांचे हार्दिक आभार.