अवैध दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई! पोलिसांना पाहताच आरोपी फरार.
मुख्य संपादक : मंगेश पवार
खेड शिवापूर : हवेली तालुक्यातील खेडशिवापूर गावच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर राजगड पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दि.२९/५/२४ रोजी ४:३० वा. सुमारास खेड शिवापुर ता. हवेली जि. पुणे शिवापूर खोपी जाणाऱ्या रोडच्या कडेला असणाऱ्या ओढ्यामध्ये गोरख लक्ष्मण खुडे वय ४८ वर्ष रा.वेताळ वस्ती खेडशिवापूर ता. हवेली यांनी त्याच्या कडे असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या १० लिटरच्या कॅन्डमध्ये ६ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू प्रति लिटर दीडशे प्रमाणे असा एकूण ६ लिटरची किंमत ९०० रुपयाचा प्रोव्हीशनचा माल बाळगून त्याच्या ओळखीच्या लोकांना विक्री करत असताना राजगड पोलिसांना मिळून आला असून पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला आहे.
म्हणून पप्पू रामा शिंदे पोलीस शिपाई राजगड पोलीस स्टेशन यांनी त्याच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.