बाणेर पोलीस स्टेशनकडील तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी, बाणेर टेकडीवर तरुणींना लुटणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या.
पुण्यभूमी न्यूज नेटवर्क
संभाजी पुरीगोसावी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते नुकतेच पुणे शहरांतील ७ नव्या पोलीस ठाणेचे उद्घाटन करण्यात आले. या पोलीस ठाण्याचा कारभार सुरू झाला बाणेर पोलीस ठाणेच्या स्थापनेनंतर बाणेर पोलिसांनी पहिला गुन्हा उघडकीस आणण्यास यश मिळाले आहे. बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या तीन महिलांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. द्रार्पत उर्फ विशाल प्रभाकर सुमखराव (वय 19 ) रा. बोराडेवाडी जाधववाडी चिखली मूळ रा. म्हाळुंगी ता. चाकूर जि. लातूर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यांत घेतले आहे. बाणेर टेकडीवर नागालँड येथील राहणाऱ्या महिला 13 ऑक्टोंबर रोजी फिरायला गेल्या होत्या. यावेळी त्यांना अडवून मारहाण करीत मोबाईल बर्डस सॅक असा 51 हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. यावेळी गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल कोयता असा 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिम्मत पाटील सहा. पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी चतुर्शिंगी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगुले पो. हवा. श्रीकांत वाघवले बाबूलाल तांदळे सुधाकर माने इरफान मोमीन बाबासाहेब दांडगे श्रीधर शिर्के आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. तसेच बाणेर पोलीस ठाणेची नव्याने निर्मिती झाली असून. या पोलीस ठाणेला देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून महेश बोळकोटगी तर गुन्हे पोलीस निरीक्षक राणी पुरी यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.*


