“वेळू–नसरापूर गटात उमेदवारी मिळाल्यास दमदार लढत देणार – पोपटराव सुके”


मंगेश पवार

भोर वेल्हा मुळशी चे कार्यसम्राट मा. आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली आणि विकास कामाच्या जोरावर आणि सहकाऱ्यांच्या सोबतीने वेळू – नसरापूर गटात गेली वीस वर्षे लोक संपर्क असून यावेळी ही ताकतीने लढणार असल्याचे राजगड साखर सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन पोपटराव सुके यांनी सांगितले.

 

पूर्वीच्या वेळू – भोंगवली या गटातून गतवर्षी निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली असल्याने आणि गेली वीस वर्ष लोकांशी असलेला संपर्क यामुळे यावेळी विजय निश्चित आहे.

 

मा. आमदार संग्राम थोपटे आणि भारतीय जनता पार्टी पक्ष श्रेष्ठी यांनी आजपर्यंत माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे याबाबत संग्राम दादा आणि पक्ष मला संधी देतील असा मला विश्वास आहे.

ADVERTISEMENT

 

वेळू – नसरापूर गटात गेली वीस वर्ष कर्मभूमी म्हणून काम करत आहे. राजगड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या तातडीने सोडविल्या आहेत.

 

यंत्रनिर्माण पतसंस्थेच्या माध्यमातून युवकांना उद्योग उभारण्यासाठी लागणारे कर्ज उपलब्ध करून दिले आणि युवकांना त्यांच्या पायावर भक्कम उभे करण्यात मोलाचे काम केले आहे.

 

नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक स्थानिक नागरिकांना रोजगाराची संधी तसेच स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

 

विविध क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडविण्याचे कार्य देखील उल्लेखनीय केले आहे.

 

त्यामुळे राजकीय, सामाजिक, औद्योगिक, क्रीडा अध्यात्मिक क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे मा. आमदार संग्राम थोपटे आणि पक्षश्रेष्ठी मला नक्कीच संधी देतील अशी आशा आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!