भोर तालुक्यातील मोरवाडी येथे रविवारी विविध विकासकामांतर्गत रस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज
मुख्य संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक :सागर खुडे
सारोळे : मोरवाडी येथील सरपंच ज्योती दीपक मोरे यांच्या पाठपुराव्याने, कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून आणि पंचायत समिती उपसभापती रोहन बाठे यांच्या विशेष प्रयत्नातून गणेश मंदिर सभागृह ५ लाख रुपये आणि काळा मळा रस्ता ५ लाख रुपये काही वर्षांपासून रस्त्याचा आणि गणेश मंदिर सभागृह प्रश्न प्रलंबित होता.
भोर, राजगड, मुळशी कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांच्या फंडातून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन रविवारी पंचायत समिती उपसभापती रोहन बाठे यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्यासाठी खूप वर्षांनी निधी पडला आहे.
यावेळी मोरवाडी गावचे सरपंच ज्योती मोरे,उपसरपंच, संतोष मोरे,ग्रामपंचायत सदस्य किरण मोरे, सदस्य संगीता मोरे, सदस्य सारिका मोरे, पोलीस पाटील अनिता पेटकर, मा.सरपंच सोमनाथ मोरे, श्री शिवछत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास मोरे, मयूर मोरे, आकाश मोरे, रणजीत मोरे, सुभाष मोरे, उत्तम मोरे, रोहित मोरे,आनंदा पेटकर, सुरज साळुंखे, संपत पेटकर, जालिंदर साळुंखे, प्रकाश मोरे,दीपक मोरे,केतन मोरे, अनिकेत बाठे, महेश मोरे व छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ तरुण मंडळ मोरवाडी आदी उपस्थित होते.