मराठी रोखठोक चे ज्येष्ठ संपादक दिलीप वाघमारे यांना पुरस्काराने सन्मानित
भोर संपादक मंगेश पवार
लोणंद शहरातील ज्येष्ठ संपादक दिलीप वाघमारे यांना फलटण तालुक्यातील पाडेगाव माऊली सभागृहामध्ये 31 मे रोजी वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक बाप्पू डावरे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले दिलीप वाघमारे यांना राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विविध राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते त्यांनी आजपर्यंत राज्यातील विविध चॅनेल मधून महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली आहे त्यांचा जीवन प्रवास मुक्त पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यामधून राज्यात घोडदौड सुरू आहे त्यांनी बहुजन समाजाबरोबर दलित समाजाच्या अनेक कुटुंबांना न्याय मिळवून दिलेला आहे वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलने छेडले आहेत लोणंद एसटी बस स्थानक साठी मराठी रोखठोक च्या माध्यमातून आवाज उठवल्याने अखेर बस स्थानक सुसज्य असं बांधले गेले आहे अशा विविध जिवंत लोकाभिमुख विकासकामे डोंगराएवढी कामे केली आहेत सर्व प्रशासनामध्ये एक वेगळी छाप निर्माण झाल्याने अधिकारांच्या बरोबर संबंध जीवाभावाचे झाल्याने विकास कामांना चालना मिळाली आहे अशा चौफेर माध्यमातून कामे धडाडीचे करणारा पत्रकार त्याचे कौतुक अख्खा महाराष्ट्रातील बहुजन वर्ग करीत आहे त्यांचे या वयातील कार्य कौतुकास्पद असल्याने अनेक संघटनांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे


