मामुर्डी येथे क्रीडा शिक्षकांचे तालुकास्तर प्रशिक्षण संपन्न.
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
मामुर्डी दि १८ : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धांमध्ये यावर्षी पासिंग बाॅल व थ्रो बाॅल हे खेळ नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत.या नवीन समाविष्ट खेळांचे प्रशिक्षण शिक्षकांना देणे आवश्यक होते. त्यानुसार जावलीचे गटशिक्षणाधिकारी मा.संजय धुमाळ यांनी हे प्रशिक्षण मामुर्डी येथे घेण्याचे नियोजन केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथे जावली तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचे तालुकास्तर प्रशिक्षण संपन्न झाले.या प्रशिक्षणाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी मा.अरविंद दळवी यांचे हस्ते संपन्न झाले.प्रास्ताविक क्रीडा समन्वयक श्री.शशिकांत गोडसे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबर खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.आपण सर्वजण मिळून या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडू असे आवाहन करून मामुर्डी शाळा स्पर्धांसाठी नेहमी सहकार्य करत असल्याबद्दल मामुर्डी शाळेचे आभार उद्घाटनप्रसंगी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी मा.अरविंद दळवी यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख मा.श्री.हंबीरराव जगताप,मा.श्री.सुरेश धनावडे,मा.श्री.रघुनाथ दळवी, क्रीडा समन्वयक श्री.शशिकांत गोडसे,श्री.सचिन पवार आदी उपस्थित होते.


