माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती, गडचिरोली तर्फे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ,
प्रतिनिधी संतोष लांडे
यावेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष श्री.मनोज उराडे यांनी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार अधिनियम मधील कलम 4 व 5 च्या अमलबजावणीबाब चर्चा केली या चर्चेमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा दि.१२/१०/२००५ पासून अंमलात आला आहे. या अधिनियमातील कलम ४ (१) (क) मधील तरतूदीप्रमाणे सार्वजनिक प्राधिकरणांनी सर्व अभिलेखा योग्य रितीने सूचीबध्द करुन त्याची निर्देशसूची तयार करणे व संगणकीकरण करणे, शक्य असेल अशा कार्यालयीन अभिलेखांचे वाजवी कालावधीत व साधन संपत्तीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण करणे व ही माहिती नेट वर्कवर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. कलम ४ (१) (ख) मधील तरतुदीनुसार हा अधिनियम अंमलात आल्यापासून १२० दिवसांच्या आत १७ बाबीवरील माहिती तयार करुन तो प्रसिध्द करणे आवश्यक होते. तथापि अनेक सार्वजनिक प्राधिकरणानी याबाबतची कार्यवाही अद्यापही पूर्ण केलेली नाही. या शासन आदेशची आपल्या अधिनिस्त सर्व शासकीय कार्यालयात अंमजबजावणी व्हावी. तसेच तशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयाला तातडीने कराव्यात अशी विनंती करण्यात आली या वेळी श्री. श्री.मनोज उराडे जिल्हा अध्यक्ष, श्री. रोशन कवाडकर जिल्हा सचिव, श्री.सूरज गुंडमवार जिल्हा उपाध्यक्ष, श्री अमित उराडे उपस्थित होते