भोर मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद कुलदीप कोंडे यांच्या पाठीशी ; विकास चव्हाण मा.सरपंच, हर्षद बोबडे.
भावी अनेक प्रभावी मात्र एक कुलदीप कोंडे.
संपादकीय भोर दि. ५ महाराष्ट्रात सध्या विधानसभेचे वारं वाहत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुका अतिशय दुर्गम भागात असून हा परिसर डोंगरांनी व्यापलेला आहे. तालुक्यामधील शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांच्या कामाचाबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना विकास बाप्पू चव्हाण यांनी सांगितले की भोर, राजगड, मुळशी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय नेते कुलदीप कोंडे अहोरात्र जनसेवेचे काम करीत आहे. एका सर्वसामान्य घरातील माझ्यासारखा तरुण सामाजिक कार्यातून कुलदीप कोंडे कुटुंबाशी जोडला जाऊन कोंडे परिवाराचा एक भाग बनलो हीच भावना मतदारसंघातील माझ्या सर्व सामान्य घरातील सर्व कार्यकर्त्यांची आहे.भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये हिंदुत्वचा विचारांचा वारसा चालवणारे कोंडे यांचे सर्व समर्थक व तळागाळातील आमच्या सारखे कार्यकर्ते नेतृत्वावर विश्वास ठेऊन भोर विधानसभेचा कायापालट करण्यासाठी सर्व मेहनतीस तयार आहोत.आज भोर तालुक्यातील प्रत्येक गावागावात कुलदीप कोंडे युवा मंच वतीने महिला भगिनींचे आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून मदत केली. तात्पुरती मदत कोणीही करतं कायमस्वरूपी ची मदत आणि कायमस्वरूपी चे काम करण्याची कुलदीप कोंडे यांची जिद्द आहे आणि त्याच माध्यमातून अनेक कॅम्प पूर्व भागामध्ये घेण्यात आले. त्या कॅम्पच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाच हजार तीनशे महिलांची कामे करण्यात आली.रात्रीच्या दोन वाजेपर्यंत जागून महिलांचे फॉर्म भरण्यात आले टोटल 2660 फॉर्म भरण्यात आले होते त्यातील 98 टक्के महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत या गोष्टीचा मनापासून आनंद होतो की केलेल्या कामाची पावती मिळाली. या कामासाठी पूर्व भागातील राजापूर गावचे शिक्षक हर्षद बोबडेसर यांनी मोलाची मदत केली.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य शलाका कोंडे यांच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी केवळ मागील पाच वर्षात मा.जि.प. सदस्य शलाका कोंडे आणि कुलदीप कोंडे यांनी मंजूर करून आणला आहे. या मोठ्या प्रमाणावरील निधीतून आज मतदारसंघातील वाडी, वस्ती,गल्ली, कॉलनीत प्रशस्त व मजबूत रस्ते, बंधारे, पुल, सामाजिक सभागृह सर्व धर्मीय सर्व जातीय समाजासाठी व त्यांच्या धार्मिक स्थळासाठी, शाळेसाठी, स्मशानभूमीसाठी तसेच शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार, विद्यार्थी, महिला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे.प्रत्येकाच्या सुखदुःखात शलाका कुलदीप कोंडे कुटुंब नेहमीच सहभागी असतात. निवडणूक असो वा नसो कोंडे कुटुंबीय अहोरात्र मतदारसंघात नागरिकांची कामे करतात.मतदारसंघातील युवा तसेच महिला भगिनींचा आशिर्वाद कुलदीप कोंडेच्या पाठीशी आहे. त्यामुळे भावी भोर तालुक्याच्या सर्वांगीण विकास व पूर्व भागातील आणि रस्ते आणि विविध कामांसाठी अनेक, प्रभावी मात्र एकच नेतृत्व म्हणजे कुलदीप कोंडे आहे.असे प्रतिपादन पेंजळवाडी गावचे युवा सरपंच विकास चव्हाण आणि हर्षद बोबडे यांनी व्यक्त केले आहे.