घरगुती वादातून विवाहितेची गळा आवळून हत्या; पतीविरुद्ध गुन्हा दाखल


नसरापूर दि. 18 जून: राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहितेची गळा आवळून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत दादासो पवार (वय 26, रा. पणदरे, ता. बारामती, जि. पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. 17 जून 2026 रोजी दुपारी 2.45 वाजण्यापूर्वी मौजे आर्वी (ता. हवेली, जि. पुणे) येथे आरोपी अक्षय रामदास तावरे (वय 28) याने पत्नी रुतुजा अक्षय तावरे (वय 25) हिला घरगुती कारणावरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 236/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 व 85 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद दि. 17 जून 2026 रोजी रात्री 9.18 वाजता करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गौर (भोर विभाग), पोलीस निरीक्षक जाधव तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!