किकवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भिलारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


संपादक :-मंगेश पवार

सारोळे : किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी येथे आज दि. १६ जून २०२६ रोजी राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, किकवी गावचे माजी सरपंच तसेच किकवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री दत्तात्रय विठ्ठल भिलारे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

या कार्यक्रमास बिपीन  मोदी(सामाजिक कार्यकर्ते, व्यवसायिक पुणे), अमोल गुजराती (बांधकाम व्यावसायिक), नरेंद्र मोदी (माजी तंटामुक्ती अध्यक्ष), संस्थेचे उपाध्यक्ष  प्रशांत कोंढाळकर, सचिव  राजेंद्र भोसले, सहसचिव  गणेश भिलारे, संचालक  बाळासाहेब चव्हाण, संजय राऊत, प्रशासकीय अधिकारी  शरद सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते  अभिमन्यू कोंढाळकर, चेतन कोंढाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ADVERTISEMENT

 

यावेळी गुजराती वैष्णव समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष  बिपीन जयंतीलाल मोदी ( विशानिमा महाजन ट्रस्ट (पुणे-सातारा) चे नवनिर्वाचित अध्यक्ष ) आणि खजिनदार  अमोल गुजराती यांचा किकवी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व किकवी ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

तसेच विद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भिलारे यांचा वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक  विनोद राऊत यांनी विद्यालयाच्या प्रगतीविषयी, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण, तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच नवीन शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!