बांधकाम विभाग भोरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; शिवप्रहार प्रतिष्ठान आक्रमक.
संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
दि. १५ सारोळे : सारोळे ते भोंगवली आणि भोंगवली ते माहूरखिंड रस्त्याचे खड्डे जी.एस बी ने,आणि ईमरसेल लिक्विड मटेरियल वापरून चांगल्या दर्जाचे काम केले पाहिजे याबाबत शिवप्रहार प्रतिष्ठान कडून बांधकाम विभाग भोर यांना ऑगस्ट २०२४ मध्ये निवेदन देण्यात आले होते.
उपविभाग भोर यांनी मागील एक महिन्यापूर्वी त्यामध्ये मुरूम टाकून खड्डे भरले होते. त्यांनी सरळ सरळ मलमपट्टी थुखपट्टी करून जनतेची दिशाभूल केली, सा.बा.उपविभाग भोर यांचा मनमानी चालू असलेला कारभार थांबविण्यासाठी तसेच शासन रस्त्यावरती लाखो रुपये खर्च करीत आहे. खर्च करूनही त्या दर्जाचे काम केले जात नाही, सदर काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. त्यामुळे जनतेला सुख सोयी मिळत नाही.
१५ऑगस्ट रोजी होणार आंदोलन बांधकाम विभागाच्या वरीष्ठ आधिकाऱ्यानी दिलेल्या लेखी आश्वानानंतर तात्पुरते स्वरूपात रद्द करण्यात आले.त्यानुसार त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही.
त्यामुळं २० सप्टेंबर २०२४ रोजी सारोळे ते भोंगवली फाटा दरम्यान उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना आपले कार्यालय जबाबदार राहील असा इशारा शिवप्रहार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांनी दिला आहे.
सारोळे सह परिसरातील पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे.तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभागी उपस्थित रहावे.