भोंगवली गावात मध्यरात्री बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


मंगेश पवार

सारोळे :- भोर तालुक्यातील भोंगवली गावातील शिवाजी सुर्वे यांच्या घरापाशी शुक्रवार दि. 22 रोजी राणवारा हॉटेल परिसरात मध्यरात्री सुमारे २:३० वाजण्याच्या दरम्यान दोन बिबटे दिसल्याची घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

शिवाजी तुकाराम सुर्वे यांच्या घराजवळ बांधलेल्या बकऱ्या अचानक जोरजोरात ओरडू लागल्याने ते बाहेर आले. त्यावेळी घरासमोरील परिसरात दोन बिबट्यासारखे प्राणी फिरताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती वन विभागाला देण्यात येणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता राखावी, असेही सांगण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!