अनंत निर्मल ग्लोबल स्कूल (सी. बि. एस. ई).धांगवडी येथील विद्यार्थ्यांची चंदिगड (पंजाब) येथे होणाऱ्या तायक्वांदो इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड.
मंगेश पवार
सारोळे प्रतिनिधी : चंदिगड पंजाब येथे होणाऱ्या इंडो नेपाळ इंटरनॅशनल तायक्वांदो स्पर्धेसाठी कु. सई किरण साळेकर (इयत्ता पहिली) सारोळा, कु. ईश्वरी सचिन शेटे( इयत्ता सहावी) नसरापूर ‘कु. कृष्णल पितांबर शेटे (इयत्ता सहावी) नसरापूर व कु. श्रुती सागर खिलारे (इयत्ता सहावी) शिरवळ यांची निवड झाली असून सर्व विद्यार्थी अनंत निर्मल ग्लोबल स्कूल चे क्रीडा प्रशिक्षक किरण साळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.
हि स्पर्धा दि.११ व १२ मे रोजी चंदीगड ला होणार आहे.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष, तथा माजी मंत्री – अनंतराव थोपटे साहेब, भोर, राजगड, मुळशी कार्यसम्राट आमदार – संग्राम थोपटे, मानद सचिव – स्वरूपा थोपटे व कॅम्पस चे इस्टेट मॅनेजर राहुल खामकर, स्कूलचे प्राचार्या – सबिहा शेख यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी प्रोत्साहन देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.


